Home जालना जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीतील इसमाचा खून करणाऱ्या आरोपीस 02 तासात केले...

जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीतील इसमाचा खून करणाऱ्या आरोपीस 02 तासात केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

180

आशाताई बच्छाव

1001444855.jpg

जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीतील इसमाचा खून करणाऱ्या आरोपीस 02 तासात केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 27/04/2025
दिनांक 25/0 4/ 2025 रोजी रात्रीच्या सुमारास नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे राहणार कन्हैया नगर जालना यास कोणीतरी अज्ञात इसमाने देऊळगाव राजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत जामवाडी शिवारात जीवे ठार मारले होते सदर इसमाच्या मारेकऱ्यास तात्काळ शोध घेऊन अटक करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक जालना यांनी श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जालना यांना सूचना दिली होती.
त्या अनुषंगाने श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जालना यांनी सदर मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून अटक करण्याच्या साठी आदेशित केल्याने सदर मारेकऱ्याचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मयत नरेंद्र उर्फ बंटी नारायण रंजवे राहणार कन्हैया नगर जालना याचा खुन त्याचा मित्र नामे संदीप ज्ञानेश्वर राऊत राहणार कन्हैया नगर जालना यांने केला असून तो सध्या जामवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास विचारपूस केली असता त्यांने सांगितले की, आरोपी हा त्याचे भागीरथी टी हाऊस वर असताना मयत नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे राहणार कन्हैया नगर जालना हा त्यास दारू पाज म्हणून लागला आरोपीने त्यास दारू न पाजल्याने दोघांमध्ये झटापट होऊन मयताने आरोपीच्या आईवर शिवीगाळ केल्याने या गोष्टीचा मनात राग धरून आरोपीने मयतास लोखंडी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून त्याचा खून केला. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे तालुका जालना येथे आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. पोलीस उपाधीक्षक श्री आयुष नोपानी ,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेन्द्र वाघ, पोलीस हवालदार सॅम्युएल कांबळे, गोपाल कौशिक, रामप्रसाद पव्हरे ,भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, जगदीश बावणे, संभाजी तनपुरे, सुधीर वाघमारे, सतीश श्रीवास, देविदास भोजने, आक्रुर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षीरसागर, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, गणपत पवार ,सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.

Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत.
Next articleपहलगाम घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.