आशाताई बच्छाव
इम्पॅक्ट ! शल्यचिकित्सकांच्या निर्णयाला कोलदांडा ! – ‘युवा मराठा ‘ चा परफेक्ट निशाणा ! – पाच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या प्रतिनियुक्त्या खारीज !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा जिल्हा रुग्णालयात ‘प्रतिनियुक्तीचा’ घोळ! अशी बातमी प्रसारित करून’ युवा मराठा ‘ने तत्पूर्वी सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान यावृत्ताची दखल आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या तक्रारीची दखल घेऊन पाच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या प्रतिनियुक्त्या खारीज करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शल्यचिकित्सक तोंडघशी पडलेत. पैसे घेऊन की काय? सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली होती.
विषय असा आहे की, ‘हॅलो बुलढाणा’ने चंद्रकांत खरात यांच्या तक्रारीवर तत्पूर्वी सडेतोड वृत्त प्रसारीत केले होते. विदर्भातील बुलढाणासह अकोला उपसंचालकांच्या अधिनस्त असलेल्या यवतमाळ अकोला, अमरावती, वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रतिनियुक्ती प्रक्रियेत बेकायदा प्रतिनियुक्तीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे वास्तव मांडण्यात आले होते. याचा परिणाम दिसून आला आहे. कारण आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांनी नुकताच एक आदेश दिला आहे. या आदेशात म्हटले आहे की, शासन मान्यता न घेता केलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात याव्यात. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सदर बेकायदा प्रतिनियुक्तीचा घोळ झाल्याने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला ‘युवा मराठा ‘चे बळ मिळाले. परिणामी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अख्यारीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या प्रतिनियुक्त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.