आशाताई बच्छाव
धक्कादायक ! आईने विष प्राशन केले, मुलाने घेतला जन्मदात्या बापाचा बळी; डोक्यात फावडे टाकून खून ! मोताळा तालुक्यातील घटना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मोताळा चालू वर्षात बुलढाणा जिल्ह्यात खुनाचा घटना वाढल्या आहेत. चालू एप्रिल महिन्यात आतापर्यंत ५ खून झाले आहे. १जानेवारी ते आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात २३ खुनांची नोंद झाली आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंदखेड येथे जन्मदात्या बापाचा मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात २३ खुनांची नोंद झाली आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंदखेड येथे जन्मदात्या बापाचा मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर कौतिक बावणे रा. सिंदखेड यांचा त्यांचा मुलगा भैय्या उर्फ यश नंदकिशोर बावणे (२०) याने खून केला. कौटुंबिक वादांमुळे यश आपल्या वडिलांवर रागावलेला होता. याच रागात त्याने वडिलांच्या डोक्यात आणि छातीवर फावड्याच्या दांड्याने मारहाण केली, त्यात नंदकिशोर यांचा मृत्यू झाला. आईने केले विष प्राशन…
प्राप्त माहितीनुसार १४ एप्रिल रोजी बावणे कुटुंबात कौटुंबिक वाद झाला होता. यातून यशची आई कविता बावणे बुलडाणा
खामगाव
जिल्ह्याचं राजकारण
यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलेले होते. याचाच राग अनावर झाल्याने यशने वडील नंदकिशोर बावणे यांचा खून केला.. या प्रकरणी विद्यानंद कौतिक बावणे ( मृतकाचे भाऊ) यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे भैय्या उर्फ यश नंदकिशोर बावणे (२०)) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.