Home जालना जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर 85 किलो 640 ग्रॅम गांजा सह 03...

जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर 85 किलो 640 ग्रॅम गांजा सह 03 आरोपी जेरबंद स्थागुशा व दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

77

आशाताई बच्छाव

1001438525.jpg

जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर 85 किलो 640 ग्रॅम गांजा सह 03 आरोपी जेरबंद स्थागुशा व दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 24/04/2025

सविस्तर वृत्त असे की मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल साहेब सो.यांनी जालना जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री करणारे इसमांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दिनांक 23/04/2025 रोजी जालना शहरातून छत्रपती संभाजीनगर कडे एक MH 16 AT 8302 या कारमधून तिघेजण आपली पदार्थ गांजाची अवैध्य वाहतूक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा जालना यांनी संयुक्त कारवाई करून आरोपी नामे 1) विजय अशोक गाढे वय 42 वर्ष रा. शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर 2) अमोल द्वारकादास चांदणे वय 32 वर्ष रा.रुई तालुका अंबड जिल्हा जालना 3) बाबासाहेब पंढरीनाथ मुंजवार वय 36 वर्ष रा.भार्डी ता.अंबड जिल्हा जालना यांचे ताब्यातून एकूण 85 किलो 640 ग्राम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन व चार मोबाईल एकूण किंमत 28,93,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोऊपनि बाबासाहेब खार्डे दहशतवाद विरोधी शाखा जालना यांचे तक्रारीवरून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे चंदन हिरा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे चंदनझीरा हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल साहेब व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी श्री अनंत कुलकर्णी उपविपो अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनि श्री योगेश उबाळे,पोउपनी श्री राजेंद्र वाघ, पोउपनी बाबासाहेब खार्डे, पोउपनी यासीन,ASI/शेख अख्तर,पोहेकॉ मारोती शिवरकर, विनोद गडदे, कैलास कुरेवाड,ATB जालना स्थानिक गुन्हे शाखा चे रुस्तुम जैवाळ, रामप्रसाद पव्हरे, गोपाल गोशीक, सतिश श्रीवास, इरशाद पटेल, सचिन राऊत, कैलास चेके, चालक भारत कडूळे , सौरभ मुळे, गणेश वाघ ( फोटोग्राफर) यांनी केली आहे.

Previous articleमराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये-शेतकरी नेते विनायकराव पाटील
Next articleभंडारात तहसील कार्यालयासमोर तलाठी व मंडळाधिकारी यांचेएक दिवसीय धरणे आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.