Home जालना म्हसरूळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी हरीनाम घेतांना भाविक

म्हसरूळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी हरीनाम घेतांना भाविक

182

आशाताई बच्छाव

1001437911.jpg

म्हसरूळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी हरीनाम घेतांना भाविक

जाफराबाद तालुका प्रतिनिधी मुरलीधर डहाके

म्हसरूळ बदर वाडी येथे श्री लक्ष्मी मातेच्या कृपेने अखंड हरीनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी हरिपाठ घेतांना भाविक भक्त हरिनामात तल्लीन झाले होते. येथे सकाळी ४ ते ६ काकडा, ८ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत भागवतगीता ,रात्री ८ वाजता हरिपाठ त्यानंतर फुगडी, देवी लक्ष्मी मातेचा जागर असे दैनंदिन कार्यक्रम होतात.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी भागवत गीता ग्रंथ वाचण्यासाठी ह.भ.प. दादाराव महाराज साबळे लिंगेवडी हे असतात. मृदुंग वादक ह.भ.प.मुळे महाराज, गायनाच्यार्य ह.भ.प.सुभद्राताई बदर, ह.भ.प.यशोदाताई बदर यांना साथ देण्यासाठी ह.भ.प.कृष्णा लहाने महाराज, सुनील बदर महाराज, विजय बदर महाराज, अनिल बदर महाराज, रवी बदर महाराज,राजू बदर महाराज, विलास बदर महाराज,उत्तमराव डोळस महाराज, पिंपळे महाराज, चंद्रकलाताई बदर, पार्वताताई बदर, जयाताई बदर, भाग्यश्रीताई लहाने,शशिकलाताई बदर, रेखाताई बदर, मंगलाताई डहाके, आशाताई बदर, रुखमनताई बदर, मंगलाताई बदर, अनिताताई बदर, लक्ष्मीताई बदर तसेच परिसरातील महिला व पुरुष भाविक मोठया संखेने उपस्थित होते.
तसेच येणाऱ्या भाविकांसाठी सायंकाळी रोज प्रसादाची व्यवस्था केलेली असते.

Previous articleकामात निकृष्टपणा आणि खोळंबळलेली कामे करा अन्यथा शिंगाडे मोर्चा काढण्याचा शानाभाऊ सोनवणेंचा इशारा
Next articleश्रीहरी बालाजी देवस्थान, चिमूर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.