Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरात झावळ्याचा रविवार साजरा 

श्रीरामपूरात झावळ्याचा रविवार साजरा 

102

आशाताई बच्छाव

1001410445.jpg

श्रीरामपूरात झावळ्याचा रविवार साजरा
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –शहरात लोयोला सदन चर्च श्रीरामपूर येथे ख्रिश्चन धर्मियानुसार ग्रुडफ्रायडे च्या या दु:खाच्या दिवसातील अगोदरचा रविवार हा दिवस झावळ्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.याप्रमाणे लोयोला सदन येथील चर्चमध्ये झावळ्याची मिरवणूक लोयोला चर्च पासून संत मदर चौकापर्यंत व चौकापासून लोयोला सदन चर्च या ठिकाणी काढण्यात आली.त्यानंतर मिस्सादान अर्पण प्रमुख धर्मगुरु रे.फा.ऑल्विन मिस्कीटा यांनी मिस्सा अर्पण केला.यामध्ये लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव,रे.फा.विक्रम शिनगारे ,रे.फा.अनिल चक्रनारायण आदी धर्मगुरुनी सहभाग घेतला.तसेच सेंट लोयोला पॅरीस कौन्सिल, सेंट झेवियर्स फॅमिली, संत तुक सिस्टर्स, कनोसा सिस्टर्स, फा. हान्स स्टाफनर प्रतिष्ठाण, लोयोला दिव्यवाणी, सेंट लोयोला गायन मंडळ, युवक मंडळ, महिला ले- कनेशियन, कमलाकर पंडीत, विजय त्रिभुवन, प्रवीण सातारकर, लता बनसोडे, सुवर्णा बोधक, प्रतिमा पंडीत, अशोक साळवे, सुरेश ठुबे, डॅनियल साळवे, पुष्पा कोळगे विजया दळवी, ललित गायकवाड, शोभा त्रिभुवन, पुष्पा साठे, लुकस दिवे, दिपक कदम, भाऊसाहेब आढाव, रविंद्र लोंढे, बबलू लोंढे, संजय लोंढे, रविंद्र त्रिभुवन, सुनिल पारधे यांच्यासह सर्व ख्रिस्ती भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते

Previous articleझावळ्याचा रविवार
Next articleकोसगाव येथे भैरवनाथ महाराज यांचे पालखी मिरवणूक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.