Home मराठवाडा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि जिल्हा परिषद, लातूरच्या संयुक्त विद्यमाने...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि जिल्हा परिषद, लातूरच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

90

आशाताई बच्छाव

1001410411.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि जिल्हा परिषद, लातूरच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

संजीव भांबोरे
लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद स्थायी सभागृह, लातूर येथे दिनांक १५ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मा वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक मा सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा राहुल कुमार मीना, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा डी. टी. आंबेगावे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जिल्हापरिषद लातूर येथील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार व पत्रकारांचे कुटुंब आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मराठवाड़ा अध्यक्ष विष्णु आष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव देडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा सचिव दिनेश गिरी यांनी आवाहन केले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणार्थ विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार, त्यांचे कुटुंब, लातूर शहर व परिसरातील गरजू कुटुंबासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा आपण लाभ घ्यावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleपाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
Next articleयंदा २१०० कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे टार्गेट! पीक कर्ज वाटप दरात १०ते१५ टक्क्यांनी वाढ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.