Home विदर्भ हिंगोलीत होमिओपॅथी चे जनक डॉ. सम्यूमुल ह्यनिमन ह्यांच्या २७० व्या जयंती निमित्त...

हिंगोलीत होमिओपॅथी चे जनक डॉ. सम्यूमुल ह्यनिमन ह्यांच्या २७० व्या जयंती निमित्त मोफत होमिओपॅथी औषधी वाटप करण्यात आले

115

आशाताई बच्छाव

1001409183.jpg

हिंगोलीत होमिओपॅथी चे जनक डॉ. सम्यूमुल ह्यनिमन ह्यांच्या २७० व्या जयंती निमित्त मोफत होमिओपॅथी औषधी वाटप करण्यात आले
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील– होमिओपॅथी चे जनक विश्व वंदनीय डॉ. सॅम्युएल हैनिमन ह्यांची जयंती जगभरात १० एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दीन म्हणून साजरी केली जाते, ह्या अनुषंगाने हिंगोलीच्या होमीओ आरोग्य साधना ह्या क्लिनिक मधे रुग्ण, होमिओपॅथिक डॉक्टर्स व होमीओपेथी हितचिंतकांच्या उपस्थितीत उन्हाळ्याच्या त्रासा पासून वाचवण्यासाठी मोफत होमिओ औषधी वितरण करून संपन्न झाले.विशेष म्हणजे होमीओ आरोग्य साधना च्या माध्यमातून डॉ.गणेश अवचार हे मागील सलग २५ वर्षांपासून जनसामान्यांना उन्हाळा सुसह्य व्हावा व उन्हाळ्यात उष्णतेचे दुष्परिणाम होवू नयेत म्हणून मोफत होमीओ औषधी चे वाटप करतात पुढील वर्षी ह्यापेक्षाही व्यापक आणि मोठे स्वरूप देवून त्यापुढे माझे चिरंजीव डॉ. अभिजीत व स्नुषा डॉ.सौ अर्चना च्या माध्यमातून भव्य आयोजन करण्यात येईल असे डॉ.गणेश अवचार ह्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्हा आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ.अनिल नायक सवनेकर ,तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष मनोज आखरे,पीपल्स बँक अध्यक्ष सुनील देवडा, जी.प. माजी सभापती बाबा नाईक ,ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे, महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे राज्य कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व होमिओपॅथ डॉ.विजय निलावार,डॉ.सचिन बगडीया,जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष व मराठी भाषा जिल्हा समिती सदस्य खंडेराव सरनाईक,होमिओपॅथ डॉ.सुनील गुंडेवार,डॉ. प्रेमेंद्र बोथरा, गोकुळ बंडाळे,आदी उपस्थित होते.मागील २४ वर्षा पासून हिंगोली येथील होमीओ आरोग्य साधना चे प्रमुख डॉ. गणेश अवचार हा उपक्रम राबवत असल्याने व त्यांची पुढील पिढी ची.डॉ.अभिजित व सौ. डॉ.अर्चना आणि डॉ.सौरभ अवचार ह्यांनी देखील हा उपक्रमास पाठबळ दिल्या प्रीत्यर्थ डॉ. गणेश अवचार,डॉ.अभिजित व सौ अर्चना अवचार,पंडित अवचार,व अवचार कुटुंबातील मंडळींचा सत्कार उपस्थित रुग्ण आणि उपस्थितांनी करून पुढील सेवा कार्यास शुभेच्छा दिल्या.सर्व मान्यवरांचे स्वागत डॉ.गणेश अवचार,डॉ.अभिजीत व सौ.डॉ.अर्चनाअवचार, डॉ.सौरभ अवचार,डॉ. सुशील गुंडेवार,डॉ प्रेमेंद्र बोथरा, बाबा नाईक,सुरेश गवळी,डॉ. बगडीया, ह्यांनी होमीओ औषधी देवून उपस्थितांचे स्वागत केले. होमीओ तज्ञ डॉ.सुशील गुंडेवार,ह्यांनी ज्येष्ठ डॉ.गणेश अवचार व डॉ.विजय निलावार ह्यांच्या उल्लेखनीय कार्य गौरवार्थ इंटरनॅशनल बेस्ट सेलर,अनलिमिटेड पावर,डॉ.अनिल नायक,सवनेकर ह्यांना स्वामी विवेकानंद चरित्र,तर डॉ.गणेश अवचार ह्यांना यश प्राप्ती शिखर ही ग्रंथ संपदा देवून सत्कार केला.ह्याप्रसंगी डॉ.गणेश अवचार, डॉ.सुशील गुंडेवार,डॉ.अभिजीत अवचार,डॉ. प्रेमेंद्र बोथरा, आदींनी होमीओ औषधी डॉ.सूर्यकिरण गौड,डॉ.मह्लले डॉ.गोविंद पवार,डॉ. ,आलोक काबरा ह्यांनी अल्प दरात,सुलभ व सशक्त पणे,किती गतिमान व गुणकारी ठरते हे ह्या बद्दल अनुभव कथन केले. ,बाबा नाईक व खंडेराव सरनाईक,सुनील देवडा,मनोज आखरे ह्यांनी होमीओ आरोग्य साधना ह्या प्रतिष्ठानने भविष्यात अशी मोफत सेवा देत रहावी ह्यासाठी आमच्या शुभेच्छा असल्याच् म्हंटल जवळपास ९०० च्या वर नागरिकांनी उन्हाळ्याच्या त्रासापासून उद्भवणाऱ्या रोगांना दूर ठेवणाऱ्या होमिओ औषधींचा मोफत लाभ घेतला.दिवसातून ४ वेळा ४ गोळ्या घ्याव्यात अस डॉ.अभिजित व सौ डॉ.अर्चना ह्यांनी रुग्णांना सांगितल. जो पर्यंत नागरिकांची मागणी राहील तो पर्यंत पुढील आठवडाभर वितरण सुरू ठेवणार असल्याचं डॉ.गणेश अवचार ह्यांनी सांगून सर्वांचे आभार मानले.स्वागतपर प्रास्ताविक डॉ.अभिजीत अवचार ह्यांनी केले.ह्या प्रसंगी हॉमिओ आरोग्य साधना परिवारा सह हिंगोलीतील होमिओपॅथ,अनुभवी लाभार्थी रुग्ण आणि अनेक नागरिकांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कड्क उन्हाळा आणि त्याच्या दुष्परिणाम टाळण्यासाठी,शुभ्र वस्त्र व,डोक्याला पांढरा रुमाल वापरा,उन्हाळ्यात मिळणारी पाणीदार ऋतू फळ, ताक,लिंबू,संत्री,मोसंबी, आदी सेवन करा,अती जड पदार्था मांसाहारी पदार्थ सेवन टाळा,उष्माघात झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे रूग्ण घेवून जा निष्काळजी करू नका अश्या टीप्स डॉ.अभिजित गणेश अवचार ह्यांनी उपस्थित रुग्ण नागरिक आणि लाभार्थ्यांना दिल्या.हिंगोली येथील शासकीय आरोग्य यंत्रणेने जागतिक होमीओ दिनाच्या औचीत्यांने शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन कितपत केले हा संशोधनाचा व यंत्रणेने आत्म परीक्षण करण्याचा विषय असून हिंगोलीतील नामांकित डॉ.मंडळींना आयुष विभागाचे शासन आदेश निघाली का निघाले असतील पण शासकीय यंत्रणेला कळले की नाही हेच कळायला मार्ग नाही अशी खंत ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी व्यक्त केली व भविष्यात तरी लोकसहभाग,रुग्ण सहभाग,डॉक्टर मंडळींचा सहभाग,घेवून किमान शासन परिपत्रका च्या अनुषंगाने उपक्रम राबवावेत अशी मागणी केली ह्याप्रसंगी होमिओपॅथी व जनक डॉ. सम्यूएल ह्यानिमन ह्या संदर्भात डॉ.विजय निलावार ह्यांनी उपस्थितांना माहिती दिली ‌शिबिराच्या यशस्वीतेसाठी दीपक सावंत,बालाजी शिंदे,अनिल पाटील आदींनी परिश्रम घेतले संचालन पंडित अवचार तर आभार डॉ अभिजित अवचार ह्यांनी मानले.