आशाताई बच्छाव
डॉ. शिवाजी गीते यांची राज्यस्तरीय कुष्टरोग निवारण सल्लागार समितीवर निवड
हिंगोली श्रीहारी अंभोरे पाटील (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या आरोग्य विभागात २०२७ पर्यंत शून्य कुष्टरोग प्रसार उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या कुष्टरोग निवारण कृती आराखडा व निवारण राज्यस्तरीय समितीवर हिंगोली येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व चर्मरोग तज्ज्ञ डॉ. शिवाजी गीते व पुणे येथील डॉ.रोहिणी गायकवाड ह्या दोनच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती त्यांच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत करण्यात आली आहे.
डॉ. शिवाजी गीते हे विभागीय चर्म रोग वैद्यकीय संघटना अध्यक्ष असून यांनी कुष्ठरोग शोध मोहिमेत विभागीय पातळीवर मोलाची कामगिरी बजावली आहे, त्यांच्या या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष सन्मानित केले आहे. एड्स व एचआयव्ही नियंत्रण आदी कार्यक्रमातही त्यांनी गेल्या १० वर्षांत सातत्यपूर्ण व प्रभावी सेवा बजावली आहे.नांदेड,परभणी हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सध्या डॉ. शिवाजी गीते हे हिंगोली जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सेवाभावा मुळेच ही गौरवपूर्ण निवड झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या समितीत पुणे येथील डॉ. रोहिणी गायकवाड यांचाही समावेश करण्यात आला आहे. या दोघांची निवड ही त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची पावती असल्याचे म्हटले जात आहे. दि.२६ एप्रिल रोजी राज्यस्तरीय आराखडा निर्मिती समिती ची २५ एप्रिल रोजी सहसंचालक आरोग्य विभाग येथे समन्वय बैठक व कार्य शाळा सर्व नियुक्त मंडळींच्या सहभागाने आयोजित असून डॉ.शिवाजी गीते ,आणि विविध जिल्ह्याचे विभागाचे आणि राज्याचे तज्ञ मार्गदर्शक अहवाल व सूचना मांडणार आहेत.
या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन होत असून, हिंगोलीसारख्या छोट्या जिल्ह्यातून डॉ.शिवाजी गीते ह्यांना राज्यस्तरीय सल्लागार समितीत प्रतिनिधित्व मिळाल्याने जिल्ह्याचा सन्मान वाढल्याची भावना हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे, तर कळमनुरीत आमदार संतोषराव बांगर, आय. एम .ए.संघटना,डॉक्टर्स असोसिएशन,चर्मरोग संघटना,तसेच महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघाचे राज्य कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय निलावार यांनी व्यक्त केली आहे.समितीत पुढील प्रमाणे तज्ञ डॉक्टर्स आदींच्या निवड नियुक्त्या झाल्या आहेत…






