Home जालना पिंपळगांव रेणुकाई येथे सहा एकर मधील मकाचे उभे पिक जळून खाक शेतकऱ्यावर...

पिंपळगांव रेणुकाई येथे सहा एकर मधील मकाचे उभे पिक जळून खाक शेतकऱ्यावर अस्मानी संकट

138

आशाताई बच्छाव

1001408126.jpg

पिंपळगांव रेणुकाई येथे सहा एकर मधील मकाचे उभे पिक जळून खाक शेतकऱ्यावर अस्मानी संकट

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

दिनांक ,,10 रोज गुरुवार,,
भोकरदन तालुक्यातील, पिंपळगाव रेणुकाई येथील, गोपाल भैय्यासाहेब देशमुख यांच्या सहा एकर उभ्या मकाला, भर दुपारी उन्हाच्या वेळेस अचानक , आग लागली असता शेजारी चहुबाजूनी असलेले शेतकरी, धावून आले,
परंतु उन्हाचा टाईम व , जोराची हवा वादळ असल्यामुळे, मका विझवण्यात अपयश आले,
पाहता पाहता शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर, मोठ्या कष्टाने कमवलेले पीक उभे जळून गेले,
गोपाल देशमुख हे गेल्या दोन वर्षापासून प्रायव्हेट बँकेच्या कर्जाने व व्याजाचे पैसे भरण्यामध्ये, त्याची आर्थिक परिस्थिती पार कोलमडले आहे,
सध्या खाजगी बँकेचे 3 लाख रुपये व सोसायटीचे 20,000 हजार रुपये, असे गोपाल देशमुख यांच्यावर कर्ज आहे,
शेतीला एक ते दीड लाख रुपये खर्च आलेला आहे,
आता हे पैसे कुठून फेडावे, असे , मोठे संकट या शेतकऱ्यांसमोर उभे राहीले आहे
अशा संकटकाळी शासनाने, आपल्याला काहीतरी मदत करावी असे गोपाल देशमुख यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
सदरील मक्का जळाली का कुणी मुद्दामहून जाळली याविषयी पिंपळगाव तसेच परिसरात शेतकरी चर्चा करत असून शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.