आशाताई बच्छाव
मौजपुरी पोलीस स्टेशन तर्फे आवाहन अफवांवर विश्वास ठेवू नये – स.पो.नि.मिथून घुगे
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 11/04/2025
रामनगर येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला असून सदर वादामध्ये दोन्ही कडील काही इसम जखमी झालेले आहे सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले असून जखमींची प्रकृती स्थिर आहे तसेच रामनगर येथे मौजपुरी पोलीस स्टेशन कडील सर्व स्टाफ तसेच परतुर उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी व आरसीपी असा बंदोबस्त नेमलेला असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासनाच्या वतीने पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे सर्वांनी शांतता बाळगावी तसेच कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे
मिथुन घुगे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
मौजपुरी पोलीस स्टेशन जालना






