Home उतर महाराष्ट्र घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

252

आशाताई बच्छाव

1001400803.jpg

धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ -घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आता घरकुलच्या लाभ घेण्यासाठी बँक खात्याचे पासबुक व आधार कार्ड रोजगार हमीचे जॉब कार्ड पाहिजे. ग्रामसेवक यांच्याकडे नाव नोंदवून या कागदपत्राच्या झेरॉक्स आपण जमा करा व. या योजनेचा लाभ घ्या. असे आज रोजी साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनवणे साहेब व विस्तार अधिकारी खाडे साहेब टिटाणे ग्रामपंचाय तीत येऊन घरकुल योजना संदर्भात चौकशी केली चालू वर्षात किती लाभार्थ्यांची निवड केली. आतापर्यंत बांधकाम प्रत्यक्षात किती लोकांनी चालू केले व पूर्ण झालेली घरे या संदर्भात गटविकास अधिकारी सोनवणे साहेब व विस्ताराधिकारी खाडे साहेब ग्रामसेवक सुनील पाटील यांच्याकडून माहिती घेतली. टिटाणे ग्रामपंचायत मध्ये येऊन जवळजवळ अर्धा पाऊण तास बसून घरकुल योजनेची संपूर्ण माहिती घेतली सुरू असलेली कामे प्रत्यक्ष पूर्ण झालेले घरकुल याची पाहणी केली . माननीय गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुनील पाटील यांना सूचना केली. की एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये अशाप्रकारे उद्यापासून सर्वेच्या कामाला सुरुवात करा जो कोणी गरजू व पात्र लाभार्थी असेल त्याचे कागदपत्र घ्या आणि त्याचे नाव यादीत टाका याप्रसंगी ग्रामसेवकांनी सांगितले की शासनाचे घरकुल चे ॲप चालत नाही आहे म्हणून आम्ही सर्वे थांबवलेले आहे असे त्यांनी सांगितले त्याच्यावर गटविकास अधिकारी यांनी सूचना केली की एप्लीकेशन मध्ये काही सर्वर ची समस्या येत असेल म्हणून काम थांबू नका यादी करून एप्लीकेशन काम करेल त्या वेळेस सर्व नाव एप्लीकेशन मध्ये टाका. कागदावर सर्व पात्र लाभार्थ्यांचे नावे घ्या. आता जे कोणी पात्र लाभार्थी राहिले असतील त्या सर्वांचे नावांची यादी करून घ्या . गटविकास अधिकारी सोनवणे यांनी दिल्या. सूचना. प्रत्येक पाड्यात वस्ती घरात जाऊन सर्वे करा. करा माहिती घ्या या योजनेची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक म्हणून तुमची आहे सरपंच उपसरपंच यांना जबाबदार धरणार नाही. घरकुल योजनेची जबाबदारी ग्रामसेवक यांच्यावर देण्यात आलेली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सोनवणे यांच्या सूचनेवरून पुढे गटविकास अधिकारी यांनी सांगितले या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे संख्या मर्यादा नाही मागेल त्याला घरकुल द्या अशा सूचनाही त्यांनी. दिल्या आणि एखाद्या लाभार्थ्याला या योजनेत लाभ मिळाला नाही आणि त्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या तर संबंधित ग्रामसेवक यांना जबाबदार धरू असा इशाराच ग्रामसेवक यांना त्यांनी दिला. यांच्या या सूचनेवरून हे आता स्पष्ट झाले आहे की या योजनेत गाव पुढार्‍यांचे काहीही एक चालणार नाही. यावेळी विस्ताराधिकारी खाडे साहेब यांनी मासिक मीटिंग व वसुली याची प्राथमिक चौकशी केली असता वसुलीची टक्केवारी फारच कमी आहे यावरून त्यांनी सांगितले की वसुलीची टक्केवारी न वाढल्यास संपूर्ण ग्रामपंचायतची बॉडी बरखास्त होईल असा इशारा दिला. आठ नंबर मस्टर मध्ये काही चुका आढळल्या त्यात फेरफार मध्ये मासिक मीटिंग चा अहवाल व सह्या नाहीत त्याबाबत सुधार करण्याचे त्यांनी सांगितले . ग्रामपंचायतीची कर ची थकबाकी मासिक मीटिंग चे रेकॉर्ड कमी आवास योजना सूचना गटविकास अधिकारी सोनवणे साहेब व विस्तार अधिकारी खाडे साहेब यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.