Home उतर महाराष्ट्र एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

112

आशाताई बच्छाव

1001397407.jpg

एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

७२० विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव.
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा– शहरातील एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब श्री.साहेबरावजी मराठे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सी.जी. बोरसे, प्रा. डॉ. माधव कदम, योगी दत्तनाथजी महाराज, श्री राकेश खलाने, श्री जयवंत शिंपी, मुख्याध्यापक श्री अमोल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय जीवनात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी शालेय व आंतर शालेय स्तरावर विविध स्पर्धा व नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन वर्षभर होत असते. यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात; व आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात; व विविध स्पर्धांमध्ये यश मिळवतात.
विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रेरणादायी ठरतो. असे मत यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल मराठे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.
पारितोषिक वितरण समारंभात शैक्षणिक वर्ष-२०२४-२५ मध्ये झालेल्या विविध शालेय स्पर्धांमध्ये वकृत्व, निबंध, सामान्य ज्ञान, वादविवाद, चित्रकला, पाढे पाठांतर, सूत्र पाठांतर, श्लोक पाठांतर, विज्ञान उपकरण निर्मिती, क्रीडास्पर्धा इत्यादींमध्ये यशस्वी ठरलेल्या साधारणतः ७२० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदकांचे वितरण करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभ सोबत नंदुरबार येथील प्रा. डॉ. माधव कदम यांचे अतिशय भावस्पर्शी असे ‘श्यामची आई- एकपात्री नाट्यप्रयोगाचे’ विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण झाले. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करून भाग्यवान विजेत्या पालकांसाठी भेटवस्तूंचे वितरण देखील करण्यात आले. शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक श्रीमती. अश्विनी कोळी, श्रीमती. सोनाली साळवे, श्री. राकेश खलाने इत्यादी पालकांनी आपल्या मनोगतातून केले.
या कार्यक्रमाचे अहवाल वाचन उपशिक्षिका श्रीमती. टी.बी.देवरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.एस. ए. पाटील व श्री.एन.एस. सोनवणे यांनी केले.

Previous articleमहाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाच्या सदस्य पदी नारायण भाऊसाहेब पाटील निवड झाल्याबद्दल सत्कार…
Next articleनवोदय प्रवेश परीक्षेत एन. डी. मराठे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.