Home Breaking News
196

*देवळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण*
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
देवळा:- दहिवड येथे तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह देवळा तालुक्यातील जनतेत चिंतेचे वातावरण
देवळा : काही दिवसांपूर्वी मुंबई स्थित महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या संपर्कातील अकरा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देवळा तालुका वासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र हा आनंद औटघटकेचाच ठरला. अखेर देवळा तालुक्यात कोरोना ने शिरकाव केला असून तालुक्यातील दहिवड येथील एका संशयित रुग्णाचा शुक्रवारी (दि. २९) रात्री उशिरा प्राप्त झालेला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सुभाष मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवड येथील शिंद ओहळ शिवारातील एक २८ वर्षीय तरुण मुंबई येथे कामानिमित्त राहत होता. तो दि.२० मे रोजी पहाटे दहिवड येथील घरी आला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी त्याला ताप व जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने तो दहिवड येथील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल झाला होता. संबंधित रुग्णाची लक्षणे संशयास्पद वाटल्याने त्याला चांदवड येथे पाठविण्यात आले होते. त्याच्या घशातील द्रवाचे नमुने नाशिक येथे पाठवले होते. शुक्रवारी रात्री त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णाला देवळा येथील कोरोना केअर सेंटर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णाच्या संपर्कातील पाच हाय रिस्क लोकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. दहिवड गावामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. पुढील चौदा दिवसात संपूर्ण गावाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. सदर रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला असून कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान , तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने अधिक सतर्कता म्हणून देवळा शहर आज दि 30 रोजी दुपारी 2 वाजेपासून तर उद्या दिवसभर बंद करण्यात आल्याने जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असून , नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये , प्रशासनास सहकार्य करावे ,असे आवाहन नगरपंचायत ,पोलिस प्रशासनाने केले आहे .

Previous articleमोठी बातमी : पाचव्या लाँकडाऊनसाठी राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
Next article
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.