Home अमरावती ग्रामीण साहित्य संमेलनाचा थाट:आंबेडकर साहित्य संमेलन हिवरा येथे अकरा एप्रिल ला कवी...

ग्रामीण साहित्य संमेलनाचा थाट:आंबेडकर साहित्य संमेलन हिवरा येथे अकरा एप्रिल ला कवी संमेलन.

115

आशाताई बच्छाव

1001395974.jpg

ग्रामीण साहित्य संमेलनाचा थाट:आंबेडकर साहित्य संमेलन हिवरा येथे अकरा एप्रिल ला कवी संमेलन. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे सहावी ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन ११ एप्रिलला हिवरा बुद्रुक येथे होणार आहे. संघर्ष युवक मंडळ हिवरा हे संमेलनाचे आयोजक आहे. सकाळी १० वास्तव होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपदी डॉक्टर नंदा वानखडे यांची निवड करण्यात आली आहे. प्राध्यापक विलास भवरे हे संमेलनाचे उद्घाटक असतील. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या संमेलनाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडणे आहे. महामंडळाच्या मते ग्रामीण भागातील समस्या गंभीर झाल्या आहेत, सामान्य ग्रामीण माणूस हातभार झाला आहे त्यांच्या असंतोषाला विधायक वळण देण्यासाठी साहित्य महत्वाची भूमिका बजावू शकते. संमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कथाकथन, विधान चर्चा, कवी संमेलन आणि एकपात्री नाट्य प्रयोगाचा समावेश आहे. संमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कथाकथन विधान चर्चा कवी संमेलन आणि एक पात्री नाट्यप्रयोगाचा समावेश आहे परिसरातील कार्यकर्त्यांचा सन्माननीय करण्यात येणार आहे डॉक्टर वामन गवई , प्राध्यापक विक्रांत मेश्राम, भाऊ भोजने,डॉक्टर भास्कर पाटील, डॉक्टर सिद्धार्थ वाठोरे, मयूर मेश्राम, आशिष मेश्राम, प्रवीण बडगे, नितीन सरदार आणि विवेक डोंगरे यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Previous articleकैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी कुस्त्यांची भव्य दंगल 
Next articleतो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली, लातूरचे मनपा आयुक्त मनोहरे प्रकरणात मोठं ट्विस्ट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.