Home जालना कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी कुस्त्यांची भव्य दंगल 

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी कुस्त्यांची भव्य दंगल 

130

आशाताई बच्छाव

1001395411.jpg

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी कुस्त्यांची भव्य दंगल
लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार लयलूट @ कुस्ती प्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे
—————————————-
जालना(प्रतिनीधी दिलीप बोंडे) जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त जालना शहरात दि.९ एप्रिल बुधवार रोजी दुपारी १ वाजता जलसम्राट केसरी कुस्त्यांची भव्य  दंगल आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून लाखो रुपयांची बक्षिसांची लयलूट केली जाणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन खा.डॉ.कल्याण काळे यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे हे राहणार आहेत.तर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,जिल्हा पोलिस अधीक्षक  अजयकुमार बंसल,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जालना मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राकॉचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, प्रदेश सदस्य एकबाल पाशा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख,बंकटलाल यादव, पै. भरत मेकाले, हंसराज डोंगरे, कुस्तीगीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य दयानंद भक्त, युवा नेते अक्षय गोरंटयाल,जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे,काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे बदर चाऊस, शिवसेनेचे शहरप्रमुख बाला परदेशी, भाजयुमोचे शहराध्यक्ष सुनील खरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, माजी सभापती महावीर ढक्का,व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पंच, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी,दीपक भुरेवाल, घनशाम खाकीवाले,बाबुराव मामा सतकर, राकॉचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, कुस्ती संघाचे जिल्हाध्यक्ष रवि राऊत,शिवाजी शेजुळ,आदी उपस्थित होते.

Previous articleबिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी
Next articleग्रामीण साहित्य संमेलनाचा थाट:आंबेडकर साहित्य संमेलन हिवरा येथे अकरा एप्रिल ला कवी संमेलन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.