Home मराठवाडा सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण, एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवला तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च!

सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण, एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवला तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च!

94

आशाताई बच्छाव

1001395081.jpg

सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण, एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवला तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च!
उदगीर / प्रतिनिधी बी.जी.शिंदे
उदगीर शहरात व तालुक्यातील सर्व १३२ केव्ही, ३३ केव्ही, उपकेंद्र, सौर ऊर्जा भले मोठी युनिट्साचा सतत विजेचा लपंडाव चालू असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. कोणतीही पुर्वसुचना न देता दिवसा व रात्री विज पुरवठा खंडित होत आहे. विज वितरण कार्यालयात संपर्क केला असता फोन लागत नाही. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी असा, यक्षप्रश्न निर्माण होत आहे. सततच्या विजेच्या लपंडावांना सर्वसामान्य नागरिकासह भर उन्हाळ्यात गर्मीच्या उखाड्यात विजेच्या अभावी तळपणाऱ्या ग्राहकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, कारखानदाराने, वीज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या तोंडाला काळे फासले जाईल व विजेचा पुरवठा सतत सुरू नाही ठेवल्यास गाढवावरून धींड काढण्याचा इशारा येथील महाराष्ट्र दलित तरुण संघटनेने इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी विविध क्षमतेच्या, एमव्हीए, क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवला असून आतातरी विज पुरवठा अखंडीतपणे चालू राहील अशी अपेक्षा होती परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’च, असल्याने शासकीय कामकाजासह इतर विविध कारखानदारी घरगुती व्यवसायिक तसेच गावाला व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी व ऑनलाईन माहिती सादर करताना विजेच्या अभावी कॉम्प्युटर व शासकीय, निमशासकीय कार्यालयात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनाआर्थिक दंड सोसावा लागत आहे. उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठा योजना विज पुरवठा होत नसल्याने खंडित होत आहे. तरी विज वितरण कंपनीने विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त शासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर सह महाराष्ट्र दलित तरुण संघटनेने व वीज ग्राहकांसह नागरिकांनी केली आहे.
या सततच्या विजेच्या लपंडावांना कंटाळून सोमवारी प्रभारी कार्यकारी अभियंता जाधव यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे सह इतरांनी भेट घेऊन चर्चा केली असता, ते म्हणाली की, उदगीर कार्यकारी मंडळ अंतर्गत येणाऱ्या महापारेषण, महावितरण लिमिटेड कंपनीत व या कार्यालयात मोठ्या प्रमाणात उपविभागीय अभियंता, उपाभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंताचे, लाईन मॅन चे पदे रिक्त असून तसेच विजेची मागणी जास्त असल्याकारणाने लाईनमॅन, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, उप अभियंता रिक्त पदांमुळे मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे, हे त्यांनी मान्य केले. लागलीच यापुढे विजेचा पुरवठा सुरळीत करू असे जाधव यांनी आश्वासन दिले.

Previous articleस्तुत्य उपक्रम राबवल्याने नवतरुण युवकांचे कार्य कौतुकास्पदच ; तहसिलदार राम बोरगावकर
Next articleलक्ष्मीबाई भिमराव सरोदे यांचे दुःखद निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.