Home बुलढाणा पत्रकार स्वप्निल देशमुख यांच्यावर प्राण घातक हल्ला ! हल्लेखोरांवर तामगाव पोलिसात गुन्हा...

पत्रकार स्वप्निल देशमुख यांच्यावर प्राण घातक हल्ला ! हल्लेखोरांवर तामगाव पोलिसात गुन्हा दाखल

197

आशाताई बच्छाव

1001389829.jpg

पत्रकार स्वप्निल देशमुख यांच्यावर प्राण घातक हल्ला !
हल्लेखोरांवर तामगाव पोलिसात गुन्हा दाखल

डोक्याला मार असल्याने स्वप्निल देशमुख यांच्या वर शेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू.

युवा मराठा न्यूज बुलढाणा:
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील रहिवासी असलेल्या शेतकरी यांचे येथील शिवारातीत एकमेका शेजारी शेत असून पत्रकार स्वप्निल देशमुख यांच्या शेतातून पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह शेजारच्या शेतातून पुढे जातो परंतु तो शेजारच्याने धुर्यावर माती व दगड टाकून अडवल्याने स्वप्नील देशमुख यांच्या शेतातील पिकाचे शेतात पाणी साचून नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांना विनंती करूनही शेजाऱ्यांनी अडकवलेला पाण्याच्या प्रवाह मोकळा करून न केल्याने स्वप्निल देशमुख यांनी तहसीलदार यांच्या कोर्टात शेजारच्या विरुद्ध धुरा मोकळा करण्या साठी प्रकरण दाखल केले. त्या बाबत माहिती मिळताच शेता शेजारील शेतकऱ्यांनी पानाचा प्रवाह अडवणाऱ्या दोन्ही बापलेकांनी मिळून स्वप्नील देशमुख हे शेतात एकटे असल्याचा फायदा घेत त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. स्वप्निल देशमुख यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांचे वडील अशोकराव देशमुख यांनी स्वतः पोलीस स्टेशन तामगाव येथे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की
माझे कडे वानखेड भाग १ मध्ये गट क्र ७९ मध्ये १० एक्कर १३ गुठ्ठे शेती असुन ती शेती मी व माझा मुलगा माधव उर्फ स्वप्निल अशोकराव देशमुख वय ४० वर्षे असे वहीती करतो.आमच्या शेता शेजारी दादाराव विश्वासराव देशमुख यांचे शेत आहे. त्याचे मध्ये व आमचे मध्ये शेताचे धु-यावरुन वाद आहे. त्याबाबत आम्ही दि.२७ मार्च २०२५ रोजी तहसील कार्यालय संग्रामपुर येथे प्रकरण दाखल केले आहे. दि ५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.४५ वा दरम्यान मी घरी हजर असतांना मला माझा लहान भाउ कृष्णराव देशमुख यांचा फोन आला,त्यांनी सांगीतले माधव याचे डोक्याला मार लागलेला आहे.व त्यास ग्रामीण रुग्नालय वरवट बकाल येथे भरती केले आहे. मी व माझा भाउ कृष्णराव देशमुख असे आम्ही ग्रामीण रुग्नालय वरवट बकाल येथे जावुन पाहले माझा मुलगा माधव उर्फ स्वप्नील हा दवाखान्यात भरती केलेला असुन त्यावर उपचार सुरु असतांना दिसुन आले डॉक्टर यांनी उपचार करुन त्याचे डोक्याला जास्त मार असल्याने डॉक्टरांनी त्यास शेगाव येथे रेफर करण्यात येत आहे असे सांगीतले. त्यामुळे आम्ही त्यास १०८ च्या अॕब्युलन्स गाडीने सईबाई मोटे रुग्नालय शेगाव येथे घेवुन गेलो. दवाखान्यात पोहचल्यावर मी माझ्या जखमी मुलाला त्याचे माराबाबत विचारले असता त्याने सांगीतले की, मी आज अंदाजे ११:३० वा दरम्यान शेतात शेतातील कामधंदा करीत असतांना तेथे आपले शेजारी शेत असलेले दादाराव देशमुख व त्यांचा मुलगा किशोर दादाराव देशमुख हा हातात कु-हाड घेवुन माझे जवळ आले व मला म्हणाले की तु आमच्या विरुध्द तहसील कोर्टात कशी काय केस टाकली असे म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली. तेव्हा मी त्यांना म्हटले की तुम्ही मला शिवीगाळ करु नका तर दादाराव देशमुख यांनी मला लोटपाट करुन चापटाबुक्यांनी मारहाण करुन् बाजुला पडलेला दगड हातात घेवुन माझे डोक्यात मारला त्यामुळे माझे डोक्यातुन रक्त निघाले होते व दादाराव देशमुख व त्यांचा मुलगा किशोर मला संगणमताने म्हणाला की तु जर केस परत घेतली नाही तर तुला तुझे शेतातील विहीरीमध्ये टाकुन देवु तसेच तुला मारुन टाकु अशी जिवाने मारण्याची धमकी दिली असे म्हणुन किशोर देशमुख याचे हातात असलेली लोखंडी कु-हाड मारली ती मी चुकवली असता अंब्याचे झाडाला खोडावर घुसली. जास्त भांडण, वाद होवु नये म्हणुन तेथून निघुन शेतातुन धावत पळत वरवट बकाल येथे दवाखान्यात आलो असे मला उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे जखमी असल्याने उपचार चालू असलेल्या माझ्या मुलाने सांगितल्यावरुन दादाराव देशमुख व किशोर दादाराव देशमुख यांनी माझे मुलाला मारहाण केली आहे. त्याचे वर कार्यवाही व्हावी अशा तोंडी रिपोर्ट वरून ठाणेदार सपोनी राजेद्र पवार यांचे आदेशाने तामगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून गुण्याचा पुढील तपास बिट पोहेकॉ उमेश बोरसे यांचेकडे देण्यात आला आहे.

# स्वप्निल देशमुख यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे उपचार सुरू आहे. सदर घटने बाबत जखमी असलेल्या स्वप्निल देशमुख यांच्या वडिलांनी तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.घटना घडुन २४ तास पूर्ण होऊन सुद्धा तामगाव पोलिसांकडून जखमी स्वप्निल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला नसल्याचे उपचार घेत असलेल्या स्वप्निल देशमुख यांच्याकडून समजले.