आशाताई बच्छाव
आज खडकेश्र्वर मंदिरात शिव पार्वती विवाह सोहळा
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील अती प्राचीन काळापासून चालत आलेली रुढी पंरपरा आज ही आपल्याला मुक्रमाबाद येथील अति प्राचीन खडकेश्र्वर महादेव महादेव मंदिरात पाहायला मिळतो. शंभू महादेव व माते पार्वती यांचा विवाह सोहळा प्रती वर्षा प्रमाणे यंदाही दि.०६/०४/२०२५ रविवार रोजी संध्याकाळी ठिक ०८.०५ वाजता विवाह सोहळा खडकेश्र्वर महादेव मंदिरात संपन्न होणार आहे. तरी सर्व मुक्रमाबाद व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून शिव पार्वती यांचा आशीर्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. असे आव्हान मंदिराचे सर्व सदस्य व पुजारी राचप्पा स्वामी यांनी केले आहे.






