Home बुलढाणा EXCLUSIVE – ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान..शास्त्रामध्ये खळबळ!’ – बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ लाटणारे...

EXCLUSIVE – ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान..शास्त्रामध्ये खळबळ!’ – बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ लाटणारे शिक्षक रडारवर ! – शासनाचे शिक्षण आयुक्तांना कारवाईचे आदेश !

89

आशाताई बच्छाव

1001382645.jpg

EXCLUSIVE – ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान..शास्त्रामध्ये खळबळ!’ – बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ लाटणारे शिक्षक रडारवर ! – शासनाचे शिक्षण आयुक्तांना कारवाईचे आदेश !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा राज्यासह बुलढाणा
जिल्ह्यात शेकडो बनावट दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
वापरून शिक्षकांनी विविध सवलती व नोकरी
लाटल्याचे आणि खऱ्या दिव्यांगांना लाभापासून वंचित ठेवल्याचे अस्वस्थ चित्र आहे. ‘हॅलो बुलढाणा’ने अनेकदा या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर वृत्तातून प्रहार केला. दरम्यान आता कुठे शासनाने शिक्षण आयुक्तांना बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश दिलेत. त्यामुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
शिक्षकांना समाजात प्रचंड आदराचे स्थान आहे. परंतु काही शिक्षकांनी गुरूंची प्रतिमा मलिन जाए. परतु पगारापना गुलपा प्राना नान

केल्याचे दिसते. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान.. आपण पाहिले कोरडे पाषाण!’ असा प्रकार बोगस शिक्षकांकडून होतोय. जिल्ह्यात विविध भागात अनेक धडधाकट मंडळींनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या जागा, बस प्रवासात सूट, मध्य व इतर लाभ घेतल्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सरकारच्या योजनांचा लाभ, जसे बदली प्रक्रियेच्या भानगडीतून मुक्तता, इन्कम टॅक्समध्ये सूट, शाळेत अर्धा तास उशिरा येण्याची व लवकर
जाण्याची मुभा, शिवाय दर महिन्याला अतिरिक्त अपंग भत्ता मिळत असल्याने बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभर बोगस अपंग शिक्षकांचे पेव फुटले आहे. अशा बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांची तक्रार अशासकीय समितीचे जिल्हा सदस्य चंद्रकांत खरात यांनी करून उच्चस्तरीय तपासणीची मागणी केली आहे. याप्रकरणी अनेक वेळा ‘युवा मराठा ‘ ने वृत्त प्रसारित करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा मुद्दा लावून धरला होता हे विशेष !

Previous articleप्रचंड वादळ आणि पावसाने पिंपळगाव राजा येथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान….
Next articleEXCLUSIVE – ‘बात लग्नवाढदिवसाची!’ पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलढाण्यात येणार? – केंद्रीय -मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.