आशाताई बच्छाव
अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –आदर्श विद्या मंदिर सोनई येथे सेवापुर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब खेसमाळसकर सर वरिष्ठ लिपिक उद्धव दारकुंडे सर सहशिक्षक दिलिप वाबळे सर व पोपट खरचंद सर हे नियतवयोमानानुसार दिनांक 31/5/2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे.यांचा सन्मान हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी अध्यक्षा सौ जयश्रीताई रवीराज गडाख व संस्थाचे सचिव श्री रवीराज तुकाराम पा.गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी शिक्षक सोसायटी चे नवनिर्वाचित सदस्य श्री अप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे यांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास शीवाशेठ बाफना, अरुण चांदघोडे व संस्थाचे इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी सर्व विद्यार्थ्यांनाही सहभोजन चा आस्वाद घेतलातसेचयावेळी मा. इंदूमती खंडागळे मॅडम (प्राचार्य श्री शनिश्वर हायस्कूल सोनई,) मा.श्री. उगलमुगले सर श्री तुकाराम पा गडाख विद्यालय हसनापुर त्या. शेवगाव, मा. शिवाजी कर्जुले सर (पर्यवेक्षक श्री शनिश्वर विद्या मंदिर सोनंई) मा. दिलीप लोडे सर (मुख्याध्यापक. शनेश्वर विद्यालय शनिशिंगणापूर) श्री. मुंगसे सर मोरे चिंचोले हायस्कूल, मा. आप्पासाहेब शेटे सर (मुळा कारखाना हायस्कूल सोनई, विश्वस्त शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूर) मा. लोहकरे सर गणेश वाडी हायस्कूल मुख्याध्यापक) मा. जायगुडे सर शिंगणापूर इतर मान्यवर उपस्थित होते.






