Home जालना पारध बु येथील बालाजी उत्सवास प्रारंभ

पारध बु येथील बालाजी उत्सवास प्रारंभ

57
0

आशाताई बच्छाव

1001377293.jpg

भोकरदन जालना गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी पारध बु येथील बालाजी उत्सवास प्रारंभ
भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील बालाजी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून सकाळी नऊ वाजता महेश शेषराव देशमुख यांच्या इथून वाजत गाजत येऊन बालाजी संस्थान मंदिर या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला जातो गावातील इतर नागरिक बालाजी उत्सव कमिटीचे पदाधिकारी दिलीप बेराड समाधान गुरुजी बंकिमचंद्र लोखंडे रमेश आंबेकर व आजी-माजी लोकप्रतिनिधी व इतर पंच कमिटीतील सदस्य या कार्यक्रमात हजर असतात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडल्या नंतर पंच कमिटीच्या वतीने सायंकाळी गावांमधून निघणाऱ्या मिरवणुकीचे नियोजन करण्यात येते व सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात होते मिरवणुकीमध्ये गावातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या उत्साहाने भाग घेतात गावातील महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ तसेच नवतरुण मंडळीच्या वतीने लेझीम खेळल्या जाते व मुगदल सुद्धा फिरवली जाते काठ्या फिरवल्या जातात तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतात रात्री नऊ ते दहा दरम्यान या मिरवणुकीची सांगता होती व चैत्र महिन्याच्या निमित्ताने गावामध्ये एकादशीला महादेवाची स्वारी निघते व दुसऱ्या दिवशी देवीची स्वारी निघते त्या स्वारीचे मानकरी यांना या पंच कमिटीच्या वतीने प्रसाद म्हणून श्रीफळ दिल्या जाते या उत्सवाच्या निमित्ताने बाहेरगावी नोकरी निमित्ताने किंवा व्यवसाय निमित्ताने गेलेले लोक आवर्जून या उत्सवासाठी पारध या नगरीत दाखल होतात दोन दिवस राहून सर्व उत्सव पार पडल्यानंतर परत आपल्या गावी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात या उत्सवाला पोलीस बांधवांच्या वतीने सुद्धा चोक बंदोबस्त दिला जातो

Previous articleअमळनेरात अहिराणी साहित्य संमेलन संपन्न
Next articleश्री गणपती नागरी सहकारी पतसंस्था भोकरदन या संस्थेला मार्च अखेर रुपये 99 लाख 37 हजार 869 रुपये एवढा नफा ….. राजाभाऊ देशमुख
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here