
आशाताई बच्छाव
त्या’ आरोपीवर कारवाई करा : आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
शहरातील कापड बाजारात महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे मंगळवारी (ता.१) निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शहरातील कापडबाजारात एका महिलेला मारहाण केल्याची घटना शनिवार दुपारी घडली होती. अतिक्रमणाच्या वादातून ही घटना झाली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात हिंदुत्वावादी संघटनेच्या वतीने गर्दी केली होती. संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी कापड बाजार येथे घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.