Home उतर महाराष्ट्र कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका

127

आशाताई बच्छाव

1001358387.jpg

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका.                                                           अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यात जकाते वस्ती येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तय्यब नसीर बेपारी (रा.खाटीक गल्ली, श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत व्यक्तीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा येथील जकाते वस्तीवर एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे कत्तली साठी डांबून ठेवले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ११ जनावरांची सुटका करण्यात आली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleमहाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन ,विशाल शांति मार्च २ एप्रिल ला दीक्षाभूमी ते संविधान चौक नागपूर येथे आयोजन
Next articleजालना जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.