आशाताई बच्छाव
जाफराबाद येथील मोबाईल व्हॅन द्वारे फिरते लोकन्यायालय मध्ये 4 प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा…
जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 24/03/2025
“न्याय आपल्या दारी” व “न्याय सब के लिये” या संकल्पना प्रमाणे
मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती जाफराबाद यांच्यावतीने माहोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे दि.24/03/2025 रोजी मोबाईल व्हॅन द्वारे फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले.
सदर लोकन्यायालयाचे उदघाटन जाफराबाद न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश युवराज सी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.व्ही.एस. डिगे, माहोरा गावचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच इतर ज्येष्ठ विधीज्ञ व माहोरा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर लोक न्यायालयातील माहोरा येथील प्रलंबित दिवाणी दावे, फौजदारी खटले, दावा दाखल पूर्व बँकेची वसुली प्रकरणे इत्यादी एकूण 20 प्रकरणे तडजोडी करिता ठेवण्यात आली होती. दिवसभराच्या कामकाजात न्यायालयात दोन्ही बाजू, पक्षकारांचे म्हणणे ऐकून व त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येऊन एकूण 4 प्रकरणे आपसी समझोता व तडजोड करून मिटवण्यात आली.
अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेले वरील चार प्रकरणे ही स्थानिक बँकेची असून त्यामध्ये दोन्ही बाजूच्या पक्षकारांमध्ये समेट घडवून मिटविण्यात आली. यात मुख्यत्वेकरून दोन्ही बाजूचे विधीज्ञ श्री एस. पी. साळवे व व्हि. डबलू. जाधव यांनी समेट घडविण्यात विशेष प्रयत्न केले.
सदर फिरते लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी माननीय न्यायाधीश, विशेष सहायक सरकारी वकील श्री एस. पी. साळवे, लोकन्यायालयाचे पॅनल विधीज्ञ ॲड. एस.एस. सोरमारे, जाफराबाद पोलीस स्टेशन चे API पवार मॅडम, माहोरा गावचे सरपंच लहाने, उपसरपंच हबीब, ग्रामसेवक दांडगे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चेके सर, पवार सर व स्थानिक ग्रामस्थ इत्यादींनी उपस्थित राहून मोलाचे योगदान दिले. तसेच न्यायालयीन कर्मचारी श्री.आर.एन शहागडकर व श्री. विजय तांबेकर यांनी अथक परिश्रम घेतले.






