Home जालना मियासाहब यांच्या उरूस निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षीही ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम

मियासाहब यांच्या उरूस निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षीही ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम

92

आशाताई बच्छाव

1001341894.jpg

मियासाहब यांच्या उरूस निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षीही ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) :
दर्गा ह. जानूल्लाह शाह (बाबा) मियासाहब यांच्या 353 उरुसानिमित्त पवित्र रमजान महिन्याच्या 21 व्या रोजा निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी म्हणून दि. 22 मार्च 2025 शनिवार रोजी रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दर्गा ह. जानूल्लाह शाह (बाबा)  खुद्दाम व्यवस्थापक समितीच्या वतीने दर्गाशरीफ (मस्तगड) जुना जालना येथे
शनिवार दि. 22 मार्च रोजी ठीक सायंकाळी 5:30 वाजता आयोजित कार्यक्रमात शहरातील सर्व पक्षाचे मान्यवर नेते सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन खुद्दाम कमिटीचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. शनिवार दि. 22 मार्च रोजी दर्गा ह. जानुल्लाह शाह (मियासाहेब) यांचा सालाबादाप्रमाणे उरूस साजरा करण्यात येतो यामध्ये शहर व जिल्ह्यातील सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात हे धार्मिक स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.

Previous articleलिपिकवर्गीय कर्मचार्‍यांचे प्रश्न निकाली काढा अन्यथा आंदोलन
Next articleमाणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.