आशाताई बच्छाव
शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर
यांना अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत
नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांचा बैठकीत निर्धार
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांना ताबडतोब अटक करून राजद्रोहाचे गुन्हे तात्काळ दाखल करावेत नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन करण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांची बुधवार दि. 19 रोजी दुपारी 2 वाजता मा. खा. भाऊसाहेब देशमुख सभागृह भाग्यनगर येथे बैठक घेवून करण्यात आला असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. बैठकीच्या सुरवातीस इतिहासतज्ञ मा. म. देशमुख यांच्या निधनाबद्दल दुखः व्यक्त करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
सदरील बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले त्यामध्ये शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना तातडीने अटक करून, राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आणि खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत.
शिवद्रोह्यांना राज्यसरकार जी ममत्वाची वागणूक देत आहे आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही गुन्हेगारासम कठोर कारवाई करत उचलून आणून अटक करत नाही, तसेच त्यांच्या पाठीमागील मास्टरमाईंडचा शोध घेत नाही किंवा त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही ही वस्तुस्थिती आहे ! याच प्रवृत्तींनी अश्याच प्रकारे यापूर्वीसुध्दा राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात सुध्दा असंस्कृत, विकृत, घाणेरडी विधाने केली होती परंतु राज्यसरकारने बोटचेपी भुमिका घेतल्यामुळे अश्या राष्ट्रद्रोही शक्तीचे मनोबल वाढले आहे .






