Home बुलढाणा अवघ्या २१ वर्षाच्या मुलांने राहत्या घरातच केली आत्महत्या, निमगाव गावावर शोककळा…..

अवघ्या २१ वर्षाच्या मुलांने राहत्या घरातच केली आत्महत्या, निमगाव गावावर शोककळा…..

109

आशाताई बच्छाव

1001336514.jpg

अवघ्या २१ वर्षाच्या मुलांने राहत्या घरातच केली आत्महत्या, निमगाव गावावर शोककळा…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-नांदुरा नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील २१ वर्षीय तरुणाने घरातील लाकडाला ओडणीच्या साह्याने फाशी घेतल्याची तक्रार नांदुरा पोलीस स्टेशन येथे श्रीकृष्ण जानराव इंगळे वय ४२ वर्ष यांनी फिर्याद दिली आहे सविस्तर वृत्त असे की हरीओम आनंदा धुळे वय (२१ वर्ष) हा फिर्यादीचा आतेभाऊ असून नमूद घटना वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे घरी हजर असतांना फिर्यादीची आत्या नामे मंगलाबाई आनंदा घुळे हया फिर्यादीचे घरी येवून सांगितले की, त्यांचा मुलगा मृतक दीपक उर्फ हरीओम आनंदा घुळे याने त्यांचे घरामध्ये फाशी घेतली आहे. तेव्हा फिर्यादीने त्यांचे सोबत जावून पाहीले असता आतेभाउ मृतक दिपक उर्फ हरीओम घुळे वय २१ वर्ष हा टीन पत्राचे खाली असलेल्या लाकडी बल्लीला पांढऱ्या रंगाचा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मरण पावलेला दिसला. फिर्यादीच्या तोंडी पावलेला दिसला. फिर्यादीच्या तोंडी

रिपोर्टवरुन मपोना रेखा सरोदे यांनी मर्ग १२/२०२५ १९४बीएनएसएस सदरचा मर्ग दाखल करून नांदुरा ठाणेदार विलासराव पाटील यांचे आदेशाने प्राथमिक चौकशी पोहेकॉ गजानन चोपडे यांचेकडे तपासकामी देण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशन नांदुराचे सर्व कार्यकर्ते आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळावर दाखल होऊन सदर प्रेत शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. शोकाकुल वातावरणात निमगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास नांदुरा पोलीस स्टेशन करीत आहे.