Home बुलढाणा मर्डर..! मोताळा तालुक्यातील लालमाती फाट्यावर खून; आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन म्हणाला…

मर्डर..! मोताळा तालुक्यातील लालमाती फाट्यावर खून; आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन म्हणाला…

122

आशाताई बच्छाव

1001336499.jpg

मर्डर..! मोताळा तालुक्यातील लालमाती फाट्यावर खून; आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन म्हणाला…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा मोताळा तालुक्यातील लालमाती फाट्यावर काल, १२ मार्चच्या सायंकाळी रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. जुन्या वादातून एकाने दुसऱ्याची डोक्यात टॉमी घालून हत्या केली.. विशेष म्हणजे या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला खरा.. मात्र तो थेट पोलिस ठाण्यात पोहोचला.. आणि खून केल्याची कबुली दिली..! अनिल प्रल्हाद बावस्कर (४७, रा. पान्हेरा, ता. मोताळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना लाल माती फाट्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर घडली.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. मृतक अनिल बावस्कर आणि
पान्हेरा येथीलच प्रदीप कुळे यांच्यात जुन वाद होते. या वादातून लाल माती फाटा येथील इंडियन ऑइल पंपासमोर प्रदीप कुळे याने अनिल बावस्कर यांच्या डोक्यात लोखंडी टोमणे बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनिल बावस्कर यांचा मृत्यू झाला. फोन केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला मात्र तो थेट धामणगाव बढे पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे त्याने खून केल्याची कबुली दिली. घटनास्थळी धामणगाव पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली..

Previous articleनविन जहागीरदार यांची संस्थाने कधीच खालसा होणार नाहीत.
Next articleबुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर वसूल पात्र रकमाही काढल्या,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.