आशाताई बच्छाव
जिल्ह्यातील संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य नियोजन करा : विखे पाटील
अहिल्या नगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी -जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासोबत उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी सज्जता ठेवावी आणि समन्वयाने काम करावे. शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, स्वप्निल काळे, महावितरण अधीक्षक अभियंता राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.