Home नांदेड आंतरराष्ट्रीय महिला दिन व मातांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

आंतरराष्ट्रीय महिला दिन व मातांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

133

आशाताई बच्छाव

1001306631.jpg

आंतरराष्ट्रीय महिला दिन व मातांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

दिनांक 8 मार्च रोजी जि. प.कें. प्रा. शाळा केसराळी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन व मातांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या विद्यार्थि परिषदेने केले होते. सकाळी विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरात फुल व रांगोळीची आरास केली.
त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच श्रीमती माधुरीताई मनधरने व राजू पाटील मनधरणे तसेच अंगणवाडी ताई यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी गावचे सरपंच यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना महिलांच्या सबलीकरणासाठी योग्य ते मार्गदर्शन केले त्यावेळी माता पालकांनीही महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी,शाळेच्या मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षिका व कर्मचारी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देवून कार्यक्रमाचा समारोप केला. महिला सक्षमीकरणाच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि विद्यार्थिनींना भविष्यात आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
शेवटी सर्व माता पालकांना शैक्षणिक साहित्यरूपी भेटवस्तू देण्यात आली.

Previous articleउपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न .
Next articleस्वामी विवेकानंद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.