Home नांदेड स्वामी विवेकानंद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

87

आशाताई बच्छाव

1001306642.jpg

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

मुक्रमाबाद प्रतिनिधी /बस्वराज वंटगिरे 

मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ८ मार्च२०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन प्राचार्य विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ विलास पवार हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री चंद्रकांत पाटील आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ सूर्यकांत सकनूरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आर.बी.मादळे यांनी केले.तर प्रास्ताविक डॉ बाविस्कर रवींद्र यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ सूर्यकांत सकनूरे यांनी महिला आणि महिलासंदर्भात असलेल्या कायद्याविषयी उपस्थिताना माहिती दिली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ विलास पवार यांनी केला. या कार्यक्रमास उपस्थिताचे आभार डॉ आर.बी.बाविस्कर यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बालाजी सादगीरे, गायकवाड संविधान यांनी परिश्रम घेतले .

Previous articleआंतरराष्ट्रीय महिला दिन व मातांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
Next articleतळेगाव रोहीत रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू, चांदवड पोलिसांचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.