आशाताई बच्छाव
सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवर प्रकल्पाविरोधात युवा मराठा महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा
(संदीप पाटील/राजेंद्र पाटील राऊत)
टिटाणे/साक्री:- सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवर प्रकल्पाविरोधात युवा मराठा महासंघाच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवरचे कार्यक्षेत्र हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ व वनविभागाच्या जमिनीवर तसेच आदिवासी इनामी जमिनीवर असून,या परिसरात सुमारे पंधराशे पवनचक्की टाँवर उभारण्यात आलेले असून,आज रोजी हे टाँवर निष्कासित करण्याचे काम मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीरपणाने सुरूंग लावून उध्वस्त केले जात आहेत.त्यामुळे सदरच्या जमिनीवर मोठं मोठ्या स्वरूपात भगदाड स्वरूपात खड्डे पडत असून,हि शासकीय संपत्तीची नासधूस सर्रासपणे सुरू आहे.त्याशिवाय इतरही गंभीर प्रश्नावर सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाकडून बेकायदेशीर कामे सुरू असल्याने त्याला वेळीच आळा घालून झालेल्या गैरकारभाराची योग्य त्या पुराव्यासकट माहिती न दिल्यास १७ मार्च २०२५ पासून सुझलाँन कंपनीच्या पेटले येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी दिला आहे.






