Home उतर महाराष्ट्र शेंडी व वांजोळी परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; २ लाख ५८ हजारांचा...

शेंडी व वांजोळी परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

148

आशाताई बच्छाव

1001281617.jpg

शेंडी व वांजोळी परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
शेंडी , कारभारी गव्हाणे प्रतिनिधी -(ता. अहिल्यानगर) व वांजोळी (ता. नेवासा) या परिसरात रात्रीच्यावेळी दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ५८ हजार रुपायांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस पथकावर आरोपीने दगडफेक करण्याचा केला प्रयत्न
तुषार सावंत भोसले (वय २७, रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर), विकी संजय काळे (वय १८, रा.भोरवाडी, ता.अहिल्यानगर), सुशांत सुरेश भोसले (वय १९, रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार शेंडी येथील कजबे वस्तीवर रात्रीच्या वेळी तुषार भोसले याने त्याच्या साथीदारांसह दरोडा टाकला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच त्याचा साथीदार विकी काळे हा भोरवाडी परिसरात आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे तीन पथके रवाना केली. या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा पाठलाग केला. मात्र, पोलीस पथकावर आरोपीने दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी चोरीचे दागिने सोनार विनोद लक्ष्मण बुऱ्हाडे (रा.बुऱ्हानगर, ता.अहिल्यानगर) यास विकल्याचे समोर आले. पथकाने पंचासमक्ष सोनाराकडून ३० ग्रॅम वजनाचे २ लाख ५८ हजार रुपयांचे दागिने पंचासमक्ष हस्तगत केले.
१० ते ११ दिवसापूर्वीही दरोडा टाकल्याचे तपासत आले पुढे
ताब्यात घेतल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता अविनाश सावत्या भोसले, रमेश सावत्या भोसले (दोन्ही रा, .पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर), अभिजीत किरण भोसले, तपेश किरण भोसले, वैभव किरण भोसले (सर्व पसारा) (सर्व रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड) यांनी केला असल्याचे सांगितले. तसेच नेवासा तालुक्यातील वांजोळी शिवारात १० ते ११ दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी एका वस्तीवर दरोडा टाकल्याचे तपासत पुढे आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकराव, अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे, हृदय घोडके, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, राहुल सोळुंके, पंकज व्यवहारे, सोमनाथ झांबरे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, अशोक लिपणे, विजय ठोंबरे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, रोहित येमुल, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, अमृत आढाव, मनोज लातुरकर, सुनिल मालनकर, रमिजराजा आत्तार, भगवान थोरात, उमाकांत गावडे, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर व महादेव लगड यांच्या पथकाने केली.

Previous articleसोनई महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
Next articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.