Home बुलढाणा शेतकरी योद्धा कृती समिती चे बालाजी सोसे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा...

शेतकरी योद्धा कृती समिती चे बालाजी सोसे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा डाव कॉल रेकॉर्डिंग मुळे उघड….

122

आशाताई बच्छाव

1001278724.jpg

शेतकरी योद्धा कृती समिती चे बालाजी सोसे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा डाव कॉल रेकॉर्डिंग मुळे उघड….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-सिंदखेडराजा सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावातील शेतकऱ्याचे विविध प्रश्न घेऊ बालाजी सोसे आणि त्यांचे सहकारी जिल्हात गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकार विरुद्ध लढत आहे.पळसखेड चक्का येथील प्रलंबित असलेला पाचमुत्र्या खोऱ्यामधील पाझर तलाव 30 वर्षांपूर्वी मंजूर असतानाही तो आजपर्यंत झाला नाही,म्हणून या संदर्भामध्ये बालाजी सोसे व त्यांचे सहकार्यांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारल्या मुळे त्यांना जिवंत जाळण्याची धमकी खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
याची रीतसर तक्रार सिंदखेडराजा पोलीस स्टेशन या ठिकाणी बालाजी सोसे यांनी दिली आहे.

दोन व्यक्तींच्या फोन द्वारे,फोनच्या संभाषणामध्ये
बालाजी सोसे यांना कुठल्या ना कुठल्या प्रकरणांमध्ये गुंतवणार,जिवंत जाळू,समाजाचा आधार घेऊन जातीय रंग देऊन याचा कार्यक्रम करू असा दम दिला,तसेच यामध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांचा,या रेकॉर्डिंग मध्ये उल्लेख आहे.
माझ्या परिवाराला भविष्यात काही जरी झालं तरी त्याला, दोन व्यक्तींच्या रेकॉर्डिंग मधील ज्यांचा आवाज आहे तेच जबाबदार राहतील असे बालाजी सोसे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.या संपूर्ण रेकॉर्डिंगची चौकशी करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी फेसबुक इंस्टाग्राम व व्हाट्सअप च्या माध्यमातून तक्रार देऊन विनंती केली आहे.

Previous articleश्रीरामपूरला मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
Next articleब्रेकिंग द बर्निंग ! दूचाकी पेटली पण…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.