आशाताई बच्छाव
जनता हायस्कूल जालना येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 27/02/2025
जनता हायस्कूल जालना येथे 27 फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पवार यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पवार यांनी मराठी भाषेला फार जूनी परंपरा आणि वारसा आहे. तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे. म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे यामुळे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा आजचा आनंद द्विगुणीत झाला आहे असे त्या यावेळी म्हणाल्या तसेच त्यांनी यावेळी स्वरचित एक कविता सादर केली यावेळी विद्यार्थ्यांनीही मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वेगवेगळ्या कविता सादर केल्या तसेच यावेळी विष्णू पवार यांनी देखील एक कविता सादर केली
सदरील कार्यक्रमाला पवन जोशी, संतोष गंडाळ, प्रभाकर सावंत, बाबासाहेब पवार, विष्णू पवार ,सुधीर वाघमारे, संदीप तोडावत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.






