Home नांदेड सौ.सायली ताई देशमुख यांच्या मधुर वाणीत मुक्रमाबादेत श्री शिव महापुराण कथेस सुरुवात

सौ.सायली ताई देशमुख यांच्या मधुर वाणीत मुक्रमाबादेत श्री शिव महापुराण कथेस सुरुवात

209

आशाताई बच्छाव

1001275469.jpg

सौ.सायली ताई देशमुख यांच्या मधुर वाणीत मुक्रमाबादेत श्री शिव महापुराण कथेस सुरुवात

मुक्रमाबाद/प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील महादेव मंदिरात इच्छापूर्ती गणेश मंदिर व तुळजाभवानी मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प.सौ. सायली ताई सुशांत देशमुख( शिवणे पुणे )युवा किर्तनकार कथाकार यांच्या मधुर वाणीतून मंगळवार दि.२५ फेब्रुवारी ते दि.३ मार्च पर्यंत प्रदोष काळात सायंकाळी ७ ते १० या वेळेत शिव महापुराण कथा सुरुवात झाली आहे.
तरी मुक्रमाबादसह परिसरातील भाविक शिव भक्तांनी सात दिवस चालणाऱ्या या शिवमहापुराणकथेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर मुक्रमाबाद व आई तुळजाभवानी मंदिर तसेच श्री शिवाय नमस्तुभ्यं सेवा समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
सौ.सायली ताई पहिल्या दिवशी आपल्या मधुर वाणीत श्री शिवमहापुराणाचे महात्म्य, भगवान आदिनाथाची पुजा कशी करावी,भक्ती कशी असावी व कशी करावी या विषयावर सुंदर पध्दतीने मार्गदर्शन केले.बहुसंख्य भक्तांनी या कथेला उपस्थित होते.

Previous articleमालेगांव छावणी पोलीस स्टेशन हद्दीत व जायखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष!
Next articleकुरवेल गावातील युवा पिढी प्रगतीच्या मार्गावर,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.