आशाताई बच्छाव
गोंदी पोलिसांनी चोरी गेलेला ट्रॅक्टर 24 तासात शोध घेऊन चोरास केले जेरबंद
जाफराबाद जालना प्रतिनिधि-मुरलीधर डहाके
दिनांक 27/02/2025
सविस्तर वृत्त असे की 25/02/2025 रोजी सात वाजता चे सुमारास मौजे पैठण फाटा शहागड येथे हॉटेल विराज चे समोर सर्विस रोडवर उभा केलेले ट्रॅक्टर क्रमांक MH- 20 FU- 0989 हे ईसम नामे जनक यमाजी घमाट रा. गंगाचिंचोली तालुका अंबड जिल्हा जालना याने त्याचे स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने 5,00000/ रुपये किंमतीचे महिंद्रा कंपनीचे 605 DI अर्जुन अल्ट्रा मॉडेल असलेले ट्रॅक्टर ज्याचा आर.टी.ओ. पासिंग क्रमांक MH-20 FU-0989असे असलेले जु.वा.किं.अं. असे चोरून घेऊन जात असताना मिळून आला त्यावरून पोलीस स्टेशन गोंदी गुरनं 60/2025 कलम 303(2) प्रमाणे यातील फिर्यादी राजेंद्र सुभाष कदम व चाळीस वर्ष व्यवसाय शेती रा.कोली ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर मोबाईल क्रमांक 98 23 52 85 11 याचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद वर्णनाचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल साहेब,मा.अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साहेब जालना, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खांबे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स.पो. नि. श्री खांडेकर,पो.उपनी.हावले ,पोहेकॉ./08 केंद्रे.पोकॉ/14 सिद्दीकी,यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा पुढील पुण्याचा तपास पोहे का/08 केंद्रे करत आहेत.