Home गुन्हेगारी आँनलाईन जुगारात पैसे हरल्यामुळे दहिवडच्या युवकांचा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न

आँनलाईन जुगारात पैसे हरल्यामुळे दहिवडच्या युवकांचा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न

229

आशाताई बच्छाव

1001270474.jpg

देवळा, तालुका प्रतिनिधी भिला आहेर  : ऑनलाइन जुगारात पैसे हरल्यामुळे हरलेली रक्कम मिळवण्यासाठी चक्क पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न अंगलट आल्याने तीन जणांना पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली. त्यामुळे पुन्हा एकदा तरुणांमध्ये ऑनलाईन गेम चा व्यसनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
देवळा-मालेगाव या राज्य महामार्गावरील पिंपळगाव (वा) येथील एम. के पेट्रोल पंपावर सोमवारी दि. 24 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास तीन जणांनी पंपावरील कामगारास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम 6 हजार 140 रुपयांची जबरी चोरी करून येथून पळ काढल्याची घटना घडली. तीनही आरोपींविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळामालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी येथील इंडियन ऑइलच्या एम. के. पेट्रोल पंपावर सोमवारी दि. 24 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास सचिन बाळु आहिरे, रोशन बाळु आहिरे (दोघे रा. दहिवड, ता. देवळा) व कुणाल संजय पवार (रा. कणकापुर, ता. देवळा) हे विना नंबरची बजाज पल्सर घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी अजय बनवरीलाल यादव (वय 30, रा. सुजनीपुर कत्रोवली ता. राणींगंज जिल्हा प्रतापगढ़ राज्य उत्तरप्रदेश, हल्ली रा. पिंपळगाव वाखारी) या पंपावरील कामगाराला पकडुन खाली पाडले.

त्याला मारहाण केली व यातील एकाने कोयता काढुन धाक दाखविला व दुसऱ्याने त्याकामगाराच्या खिशातुन जबरदस्तीने 6, 140 रुपये रोख रक्कम काढुन चोरी करून पळुन गेले. अजय बनवरीलाल यादव याच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दखल घेत वरील तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सपोनि दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एन. सोनवणे करीत आहेत.
चौकट : दहिवड येथील सचिन बाळू अहिरे यास मोबाईलवर ऑनलाइन जुगार खेळण्याचे व्यसन होते त्या व्यसनापाई तो चाळीस हजार रुपये हरला होता. घरचे जाब विचारतील या भीतीने त्याने पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा विचार केला. त्यासाठी त्याचा भाऊ रोशन अहिरे व कुणाल संजय पवार रा. कणकापूर यांना त्याच्या कटात सहभागी करून घेतले. मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांचा प्लॅन धुळीस मिळाला.

Previous articleउम्मती ‘च्या वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleकळमदरेत विठ्ठल रुक्मिणी म़दिराचे भुमिपुजन उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.