Home जळगाव गुड शेपर्ड अकॅडमीचा अजिंक्य पगारेची इस्रो टूर साठी निवड

गुड शेपर्ड अकॅडमीचा अजिंक्य पगारेची इस्रो टूर साठी निवड

125

आशाताई बच्छाव

1001268581.jpg

गुड शेपर्ड अकॅडमीचा अजिंक्य पगारेची इस्रो टूर साठी निवड

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित अशी मुंबई येथील डॉ. होमी भाभा फॉउंडेशन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. सदर स्पर्धेत चाळीसगाव येथील गुड शेपर्ड अकॅडमीचा इयत्ता 10 वीचा विद्यार्थी अजिंक्य विजय पगारे याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावत अलौकिक यश संपादन केले.
या यशामुळे त्यास भारतातील नामांकित अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) येथील शास्रज्ञासोबत शिकण्याची व राहण्याची संधी मिळणार आहे व डॉ. होमी भाभा फॉउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे.
अजिंक्यने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत रजत पदक प्राप्त केले असुन विविध स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादन केले आहे.
त्याच्या यशाबद्दल शाळेने त्यास बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर चा पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
अजिंक्य यास शाळेचे प्राचार्य डॅनियल दाखले, विज्ञान शिक्षक शैलेंद्र मराठे व नीलिमा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Previous articleआमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून ५० वर्षानंतर ४३ किमीचा पांझण डावा कालव्याचे होणार कॉंक्रीटीकरण,
Next articleचाळीसगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.