Home नांदेड नांदेड जिल्ह्यात पतीकडून पत्नी व मुलीची निर्घृणरित्या हत्या सर्वत्र खळबळ

नांदेड जिल्ह्यात पतीकडून पत्नी व मुलीची निर्घृणरित्या हत्या सर्वत्र खळबळ

216

*नांदेड जिल्ह्यात पतीकडून पत्नी व मुलीची निर्घृणरित्या हत्या सर्वत्र खळबळ*
देगलूर,(संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथे पतीने सासरवाडीला येऊन पत्नी व एक वर्षाच्या मुलाची गळ्यावर चाकूने वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना काल बुधवारी दि.२७ रोजी सकाळी घडली.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तानाजी भुताळे वय ३० रा.येडूर ता,देगलूर जि.नांदेड हा मंडलापूर येथे सासरवाडीला आला असता त्याच्या पत्नीस गावी येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला.काल बुधवारी दारुच्या नशेत मुखेड-देगलूर रस्त्यावर असलेल्या मंडलापूर येथे शिवारात पत्नीच्या राहत्या घरी रागात येऊन पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची चाकूने गळ्यावर वार करुन क्रुररित्या हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले .
तर याबाबत आधिक तपास पोलिस करत आहेत.आरोपी पळून जात असताना गावातील नागरिकांनी त्यास पकडून झाडाला बांधून ठेवले व पोलिसांना माहिती दिली.घटना कळताच पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर हे घटनास्थळी दाखल झाले सदर घटना कळताच आजूबाजुच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती.
मयत वैशाली तानाजी भुताळे वय २५ आणि आदेश तानाजी भुताळे वय १ यांच्या हत्येने संपूर्ण तालुका हादरला असून पोलिसांनी आरोपी तानाजी भुताळे यास अटक केली आहे.

Previous articleलॉकडाऊन शिथिल करताना काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Next article२५ डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये भीषण आग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.