आशाताई बच्छाव
अल्पवयीन मुलीचं दुप्पट वयाच्या मुलासोबत प्रेम जडलं, कॅफेत भेटायचं ठरलं अन् नको ते घडलं, घटनेने मलकापूर परिसरात खळबळ….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मलकापूर तालुक्यातील एका तरुणाने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कॅफेतच भेटायला बोलवून त्याच ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. सविस्तर वृत्त अशे की सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलावर प्रेम करणं अल्पवयीन मुलीला चांगलंच महागात पडलं आहे. वयाने दुप्पट असलेल्या एका तरुणाने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कॅफेतच भेटायला बोलवून त्याच ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार जिल्ह्याची घटना घडली आहे.आरोपी
दोघांनी भेटायचे ठरवले.पीडित मुलगी याठिकाणी आरोपीला भेटायला आली असता आरोपीने पीडितेच्या अज्ञातपणाचा फायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध कॅफेतच लैंगिक अत्याचार केला. या घटनेबद्दल घरच्यांना सांगितलं तर घरचे मारतील, या भीतीने घडलेला प्रकार मुलीने कुणालाच सांगितला नाही. मात्र घटनेच्या दोन महिन्यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर पीडितेने पालकांसह मलकापूर पोलीस ठाण्यात जात आरोपी समीर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर पुन्हा मलकापुरातील चिंतामणी नगर भागात तरुणीवर बलात्कार झाला. आरोपी समीर याने पीडित मुलीचे नको त्या अवस्थेतील अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. ते समाज माध्यमावर प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे पीडित मुलीने तक्रार मध्ये नमूद केले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.