आशाताई बच्छाव
इस्कॉनवर बंदी घाला नाहीतर आम्ही भाविकांना मारून टाकू’; इस्लामी गटाचा मोहम्मद युनूस सरकारला अल्टिमेटम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था )
शेख हसीना सत्तेतून गेल्यानंतर बांगलादेशमध्ये (Bangladesh) जातीय तणाव सातत्याने वाढत आहे. मूलतत्त्ववाद्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे आणि विशेषतः हिंदूंचे जगणे कठीण केले आहे.
बांगलादेशातील नवीन अंतरिम सरकारही जातीय परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरत आहे. याचे नवे उदाहरण समोर आले आहे. चितगावस्थित इस्लामिक संघटना हेफाजत-ए-इस्लामने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना किंवा इस्कॉनवर (ISKCON) बंदी घालण्याची मागणी केली आहे. इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
राधारमण दास यांनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, ‘बांगलादेशी मुस्लिमांनी मोहम्मद युनूस यांना इस्कॉनवर बंदी घालण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा ते इस्कॉनच्या भक्तांना पकडून त्यांची निर्घृण हत्या करू लागतील.’ लेटेस्टली मराठीने स्वतंत्रपणे व्हिडिओची सत्यता पडताळली नाही. इस्लामिक संघटना हेफाजत-ए-इस्लामने शुक्रवारी रॅली काढली. संघटनेने रॅलीत हिंसक घोषणाबाजी करत बांगलादेशच्या अंतरिम सरकारला इशारा दिला.
इस्कॉनचा हिंदूंविरोधात भडकाऊ वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासह तस्लिमा नसरीन यांनी आपल्या पोस्टमध्ये इस्कॉन सदस्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी लिहिले, ‘चितगावस्थित हेफाजत-ए-इस्लाम या संघटनेने इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आज त्यांचा नारा होता: ‘एक इस्कॉन पकडा, मग कत्तल करा.’ हेफाजत-ए-इस्लामने दहशतवाद पुकारला आहे.
त्यांना इस्कॉन सदस्यांना मारायचे आहे. इस्कॉन ही काय दहशतवादी संघटना आहे की तिच्यावर बंदी घालावी?’ ने मुहम्मद युनूस सरकारला अल्टिमेटम दिला-