Home बुलढाणा ब्रेकिंग ! खामगाव हादरले ! चाकूहल्ल्यात एका महिलेचा मृत्यू, दोन गंभीर !

ब्रेकिंग ! खामगाव हादरले ! चाकूहल्ल्यात एका महिलेचा मृत्यू, दोन गंभीर !

106

आशाताई बच्छाव

1001229202.jpg

ब्रेकिंग ! खामगाव हादरले !

चाकूहल्ल्यात एका महिलेचा मृत्यू, दोन गंभीर !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- खामगाव शहरातील शंकर नगर भागात काल रात्री 8:30 वाजता जुन्या वादातून घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरला आहे. एका युवकाने तीन महिलांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा अकोल्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन महिला मृत्यूशी झुंज देत आहेत. हल्ल्यानंतर आरोपी
घटनास्थळावरून फरार झाला, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला वेग दिला. फक्त पाच तासांत आरोपीला आवळून मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले.

या दुर्दैवी घटनेमुळे खामगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा हल्ला नेमका कशासाठी झाला याचा तपास पोलीस करत असून, आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

Previous articleकाही मिनिटातच होत्याचे नव्हते झाले; आगीत घर जळून खाक, कुटूंब उघड्यावर ! पळसोडा गावातील घटना
Next articleघोडेगाव मध्ये रोहिदास महाराज जयंती उत्साहामध्ये साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.