आशाताई बच्छाव
काही मिनिटातच होत्याचे नव्हते झाले; आगीत घर जळून खाक, कुटूंब उघड्यावर ! पळसोडा गावातील घटना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पळसोडा गावात घराला आग लागुन संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजता उघडकीस आली. विष्णू सोनाजी भेंडोकार वय ३३ यांचे संपूर्ण कुटूंब घरात नसतांना सदर घटना घडली. घरात आग लागल्याचे दिसल्यावर गावातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यांमध्ये
पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत घरातील १० क्विंटल
तूर, ५ क्विंटल ज्वारी, २ क्विंटल गहू, घरातील बेड, ३ फ्रीज, ३ कपाट, ३ कुलर व २० हजार रोख रक्कम जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. विष्णू सोनाजी भेंडोकार यांच्या टिनपत्राच्या घरात तीन भाऊ व आई वडील अशे चार कुटुंब रस्त्यावर आले आहे. अंगावरील कपड्या व्यतिरिक्त काहीही वाचले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे. सदर घटनेची महसूल विभागाच्या वतीने दाखल घेऊन आगीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.






