Home बुलढाणा EXCLUSIVE! सिंघम ठाणेदार संग्राम पाटील यांचा रुद्रावतार ! – डोक्यावर दारूची बाटली...

EXCLUSIVE! सिंघम ठाणेदार संग्राम पाटील यांचा रुद्रावतार ! – डोक्यावर दारूची बाटली फोडणाऱ्यांची काढली धिंड !

29
0

आशाताई बच्छाव

1001225995.jpg

EXCLUSIVE! सिंघम ठाणेदार संग्राम पाटील यांचा रुद्रावतार ! – डोक्यावर दारूची बाटली फोडणाऱ्यांची काढली धिंड !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली अलीकडे गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्याचे काम पोलिसांनी जाणीवपूर्वक हाती घेतले तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहू शकते याच दृष्टीने ठाणेदार संग्राम पाटील यांनी सिंघम स्टाईल मध्ये दोन आरोपींची धिंड काढून गुन्हे करणाऱ्यांना जणू इशारा दिला आहे.
चिखली शहरातील जयस्तंभ चौक, भवानी बिकानेर समोर, किरकोळ वादातून नुकतीच गंभीर घटना घडली होती. या घटनेची सर्वप्रथम बातमी ‘युवा मराठा ‘ ने प्रसारित केली होती. झाले असे होते की, रात्री 10:20 च्या सुमारास राजू (रावण) आणि बबलू या दोन तरुणांनी अशोक माटे यांच्या पानपट्टीत येऊन एका व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितला. माटे यांनी नंबर नसल्याचे सांगताच या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात मारहाणीत माटे यांच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून गंभीर दुखापत केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या माटे यांच्या मुलालाही या युवकांनी बेदम मारहाण केली. या हिंसाचाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची बातमी ‘युवा मराठा ‘ने प्रसारित केली होती. दरम्यान चिखली पोलिसांनी तातडीने कारवाई करत राजू (रावण) आणि बबलू यांना ताब्यात घेतले. आज मात्र ठाणेदार संग्राम पाटील यांनी या मारहाण करणारे आरोपींची शहरातून
धिंड काढून गुन्हे करणाऱ्यांना जणू इशारा दिला आहे.
जर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनने अशाच प्रकारे कार्यक्षमता दाखवली, तर गुन्हेगारांना चांगला धडा मिळेल.
संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी अशा योजना नियमित राबवायला हव्यात. अशा कार्यवाहीमुळे सामान्य नागरिकांमध्ये विश्वास वाढेल आणि कायद्याचे शासन प्रभावीपणे टिकून राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here