आशाताई बच्छाव
येवता येथील शिवश्री सुदर्शन आबासाहेब शिंदे यांच्या शिवचरित्रावर आधारित व्याख्यानाचा लाभ घ्यावा
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक/10/02/2025
जाफराबाद तालुक्यातील येवता येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा शिव व्याख्यानकर्ते शिवश्री सुदर्शन आबासाहेब शिंदे यांचे शिवचरीत्रावर आधारीत व्याख्यान दिनांक 14 फेब्रुवारी रोजी वार शुक्रवार सायंकाळी 8 वाजता कलिंका माता मंदीराजवळ येवता येथे आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमांचे अयोजन शिवप्रतिष्ठान उत्सव समिती येवता व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.
या युवा शिवव्याख्यानकर्ते शिवश्री सुदर्शन आबासाहेब शिंदे यांच्या व्याख्यानाचा जाफराबाद तालुक्यातील तसेच येवता परिसरातील शिवप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवप्रतिष्ठान उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.