Home जालना शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून समृध्द व्हावे                                                                          -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून समृध्द व्हावे                                                                          -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

86

आशाताई बच्छाव

1001217367.jpg

शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून समृध्द व्हावे

-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

गावातील  70  शेतकऱ्यांनी  केली नोंदणी
जालना,  (दिलीप बोंडे ब्युरो चीफ):– रेशीम शेती उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत तसेच अधिक उत्पादन मिळत असून जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आपला विकास साधावा. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करुन समृध्द व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

रेशीम  कोषांना  चांगले  दर  मिळण्यासाठी  उपलब्ध  करून  देणार  ड्रायर  तसेच रेशीम  धागा  निर्मितीचे  लहान  युनिट  दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी अंबड तालुक्यातील वडीकाळे येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेशीम अभियान-25 अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी  पुलकीत सिंह, तहसीलदार विजय  चव्हाण,  मंडळ  कृषी अधिकारी एस.डी.पालवे,  कृषी पर्यवेक्षक  के.पी.कोकाटे,  कृषी सहाय्यक  जी. बी. उंडे,  जिल्हा  रेशीम  कार्यालयाचे  वरीष्ठ  क्षेत्र  सहाय्यक  शरद जगताप,  सरपंच   श्रीमती  शिवनंदा भगवान ढेबे  यांच्यासह  शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले, पावसाळ्यात रेशीम कोषांना 250 ते 350 रुपये प्रति किलो  दर प्राप्त होतो तर नोव्हेंबर पासून पुढील कालावधीत रेशीम कोषांना 500 ते 700 रुपये प्रति किलो असा वाढीव दर मिळतो.  शेतकरी नैसर्गिक रित्या रेशीम कोषांची साठवण करु शकत नाही, परंतु रेशीम कोषांना उष्णता देऊन सुकविल्यास दीर्घ काळ साठविता येतात,  यामुळे  कमी  दर  असताना  शेतकऱ्यांनी  आपले  कोष ड्राय  करून  साठवावे व चांगले दर मिळत असताना त्याची विक्री करावी.

Previous articleबहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध
Next articleगोदावरीनदी काठावरील अवैधवाळू जप्तीची कारवाई सुरू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.