Home जालना जालना जिल्ह्यातील चोरी व घोरपडे करणारे सहा आरोपी जालना जिल्ह्यातून हद्दपार

जालना जिल्ह्यातील चोरी व घोरपडे करणारे सहा आरोपी जालना जिल्ह्यातून हद्दपार

176

आशाताई बच्छाव

1001211145.jpg

जालना जिल्ह्यातील चोरी व घोरपडे करणारे सहा आरोपी जालना जिल्ह्यातून हद्दपार
जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 07/02/2025

जालना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचे कलम 55, 56 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे कडून पोलीस अधीक्षक कार्यालय जालना तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे पाठवण्यात आले होते.
मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी आरोपी नावे 1) राजू शामराव सुरासे वय 49 वर्ष राहणार साईनगर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा व 2)जावेद अन्वर पठाण वय चाळीस वर्ष राहणार इंदिरानगर जालना 3) अभिजीत दुर्योधन राठोड रा.जळगाव सोमनाथ ता. जि. जालना 4) शेख शोएब उर्फ शेरू शेख गफ्फार रा. लालबाग जालना 5) ओंकार विनोद स्वामी रा.लोधी मोहल्ला जालना 6 )सतनामसिंग शमसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना यांना सुद्धा एक वर्ष कालावधीसाठी जालना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
मालाविरुद्धचे व शरीराविरुद्धचे गुन्हे करून तसेच अग्निशस्रे बाळगणारे आरोपीविरुद्ध अशाच प्रकारची सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक जालना यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री.अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष निपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दादाहरी चौरे ,पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना, पोलीस निरीक्षक संदीप भारती पोस्ट सदर बाजार, स.पो.नी.श्री. मिथुन घुगे, पो.स्टे.भोजपुरी पोलीस आमदार रुस्तुम जंजाळ, सचिन राऊत, स्थागुशा जालना, भरत ढाकणे, गणेश तेजनकर, प्रदीप करतारे, पो.स्टे.सदर बाजार यांनी केली आहे.

पोलीस जनसंपर्क कार्यालय
पोलीस अधीक्षक कार्यालय जालना