आशाताई बच्छाव
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा बदला: सोलापूर करांच्या प्रतिमेला काळा फासून प्रहार चे आक्रमक आंदोलन तात्काळ अटकेची मागणी.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेते राहुलपूरकर यांच्या विरोधात प्रहार संघटनेने आज त्रीव आंदोलन केले. सोलापूरकर यांच्या विरोधात प्रहार संघटनेने आज आंदोलन केले. प्रहार चे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यासमोर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला काळा रंग फासून आपला संताप व्यक्त केला.सोलापूर कर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच, देऊन आग्रहाहून सुटका करून घेतली असे वादग्रस्त विधान केले होते .या विधानामुळे संतप्त झालेल्या प्राहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सोलापूरकर यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली .आहे प्रहारच्या पदाधिकारी च्या मते सोलापूरकर यांची विधान तथ्थहिन व निंदनिय असल्यामुळे प्रहारच्या पदाधिकारी च्या मते सोलापूरकर यांची विधानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो .या आंदोलनात प्रवाहाचे प्रदेश प्रवक्ते जितू भाऊ देशमुख ,जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख ,संपर्कप्रमुख गोलू भाऊ पाटील ,संघटक श्याम भाऊ इंगळे ,प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.






